शिक्षणक्रांती(Educational revolution)
शिक्षणक्रांती
(Recommendations-1. -15 subjects For High school usual 7 to be taught in school remaining 8 with 100 marks each like music, acting ,dance ,computer, sports,literature writing to be learn from extra school experts or their private school . change basic qualification for different government job as for class -2 services candidate should have passed 10 subjects,for class -1 11 subjects at 10 standard.f.this education system will automatically remove the adverse effect of reservations on the basis of caste .
देशातील नव्वद टक्के लोकांना सुसंस्कृत ,चारित्र्यसंपन्न व चरितार्थ चालवण्यास सक्षम करण्यासाठी
या पुस्तकाद्वारे सुचवलेले फक्त इयता बारावी पर्यंतचेच शिक्षण पुरेसे आहे .वाचकांना एक नम्र विनंति
अशी आहे की, या शिक्षण पद्धतीला सदर लेखकाचा कल्पना अविष्कार समजू नये. ही दैवी देणगी
आहे
.सब घोडे बारा टक्के या ऐवजी प्रत्येक मुलाची आवड , कल व क्षमता लक्षात घेऊन त्यांना
विद्याविभूषित करावे . यामुळे पोटापाण्याची काळजी करावी लागणार नाही , या पद्धतीचे ते
बायप्रॉडक्ट आहे ,ती क्षमता याद्वारे आपोआप निर्माण होते .

फार गुंतागुंतीची नाही; सुलभ आहे ही शिक्षणपद्धती . सातवी पर्यंत चे सर्व विषय जसेच्या तसे शिकवावेत .
फक्त इतर विषया बरोबरच ‘’शेतीज्ञान’’ हा प्रात्यक्षिकप्रधान विषय त्यात अंतर्भूत करावा.

इयता आठवी ,नववी व दहावीसाठी खालील एकूण पंधरा विषय असावेत ! .
त्या पैकी सात विषयात उत्तीर्ण असणा-यांना पुढील इयतेसाठी प्रवेशपात्र ठरवावे .
यादीतील सुरुवातीचे सात विषय : नेहमीप्रमाणेच शाळेतच शिकवावेत.
१) मातृभाषा किंवा संस्कृत -अनिवार्य २)शेतीज्ञान - अनिवार्य ३)इतिहास ४)भूगोल
५)नागरिकशास्त्र+अर्थशास्त्र ६)विज्ञान ७)गणित
या व्यतिरिक्त परीक्षेला नसलेले शारीरिक शिक्षण (व्यायाम ,आसने इत्यादी )व गायन ,अभिनय इत्यादी विषय
शाळांमधून नेहमी प्रमाणेच शिकवण्यात यावेत . शाळेबाहेर शिकायचे आठ विषय जे वरील अनिवार्य विषय
सोडून इतर विषयांना पर्याय ठरू शकतात, ते पुढीलप्रमाणे आहेत. या विषयांच्या परीक्षा इतर सरकारमान्य
अगर सरकारी संस्था मार्फत घेण्याची व्यवस्था काही विषयांच्या बाबतीत सध्या देखील आहे
(उदाहरणार्थ शास्त्रीय संगीत ,नृत्य इत्यादी)

८. इंग्रजी किंवा अन्य परदेशी भाषा (इंग्रजी सातवीपर्यंत शिकलेलेच असते ,ज्याला आणखी इंग्रजी शिकायची
आहे त्यांची सोय यात आहेच .याशिवाय कोणतीही भाषा मनुष्य केवळ तीन वर्षांत शिकू शकतो हे ज्ञान ज्या
पालकांना आहे त्यांच्या मुलांना इतर परदेशी भाषा यामुळे शिकता येतात)

९. हिंदी किंवा संलग्न प्रांतातील भाषा अथवा मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भारतीय भाषा(संलग्न प्रांतातील
भाषा शिकणे व्यावहारिक दृष्ट्या फायद्याचे असते )१०. कांप्यूटर -हार्ड व सॉफ्ट वेअर ,इलेक्ट्रॉनिक वस्तू
दुरुस्ती ,इत्यादींचे प्रात्यक्षिक शिक्षण.

११) क्रीडा प्राविण्य -आवडत्या क्रीडाविषयाचे शिक्षण नामांकित शाळाबाह्यसंस्था अथवा तज्ज्प्रशिक्षकां
कडून घ्यावे व प्रमाणपत्र मिळवावे .
कडून घ्यावे व प्रमाणपत्र मिळवावे .
१२. हस्तकला- टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू ,नाविन्यपूर्ण यंत्र मॉडेल ,किंवा शोभेच्या वस्तू बनवणे
.मान्यताप्राप्त तज्ञा कडून वा संस्थांमधून शिकणे व प्रमाणपत्र मिळवणे .

१३. चित्र किंवा शिल्प कला - या विषयाच्या परीक्षा सध्या देखील मान्यताप्राप्त संस्था मार्फत घेतल्या
जातात . अभ्यासक्रम १०० मार्कांचा करून इयतेनुसार यास स्वतंत्र विषयाचा दर्जा द्यावा .

१४. संगीत किंवा नृत्य किंवा ,अभिनय -पैकी संगीत व नृत्यपरीक्षा मान्यताप्राप्त संस्थामार्फत घेतल्या
जातात . यातील प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम १०० मार्कांचा करून इयतेनुसार यास स्वतंत्र विषयाचा दर्जा द्यावा .

१५. साहित्यसृजन - कथा ,कविता , गीत लेखन व अन्य प्रकारचे लेखन करण्याची क्षमता ,मुळातच
सुप्तरूपात ज्या विद्यार्थ्यांकडे असते,त्यांच्या साठी हा विषय आहे. या विषयाच्या परीक्षेत उदाहरणार्थ
असा प्रश्न विचारावा . दिलेल्या ध्रुवपदानुसार दोन अंतरे तयार करा.

जेव्हा कधी तुला कळेल अर्थ प्रीतीचा
तेव्हा कळेल खोल होता घाव चित्तीचा //धृ / यातील विषय क्र ८ ते १५ या शाळाबाह्य विषयांच्या
परीक्षा घेऊन, प्रमाणपत्रे देण्यासाठी वेगळे शाळाबाह्य परीक्षा मंडळ (बोर्ड) निर्माण करावे .

नौकरी देताना विद्यार्थ्याच्या ख-या गुणवंताना म्हणजेच जे विद्यार्थी जास्त विषय घेऊन १० वि पास त्यांना
वरच्या श्रेणीतील नौका-यास पात्र समजावे ,कारण अधिक विषयाचे चौफेर ज्ञानहीच खरी हुशारी असते .
या सिद्धांता नुसार --

या पंधरा विषयांपैकी फक्त सात विषयात जे उत्तीर्ण असतील त्यांना फक्त वर्ग-४ श्रेणीच्या नौक-यात घ्यावे .
वर्ग -३ साठी एकूण नऊ विषयात पास असलेल्या व त्यावरील अधिका-यांच्या पोस्टसाठी एकूण अकरा
विषयात पारंगत असलेल्या उमेदवारांचाच विचार करावा . सेवाप्रवेशासाठी आवश्यक असलेल्या इतर
परीक्षा नेहमीप्रमाणेच घ्याव्यात इथे फक्त त्यासाठीची किमान मूलभूत शैक्षणिकपात्रता सूचवलेली आहे .

शाळेत सातवीपर्यंत शिकवणा-या शिक्षकांसाठी क्रमांक १ ते ७विषय अधिक (+)इंग्रजी व इतर
शाळाबाहय विषयांपैकी आणखी एक असे एकूण नऊ विषय अनिवार्य असावेत.

त्या पुढील दहावीपर्यंत अध्यापन करण्यासाठी पहिले सात शालेय विषय +विषय क्रमांक ८ ते १५ मधील
कोणतेही तीन विषय उत्तीर्ण असणे आवश्यक ठरवावे . एवढेच म्हणजे एकूण असेच दहा विषय पास
असण्याची अट महाविद्यालयीन शिक्षकांना ही लागू करावी अर्थातच शालेय शिक्षकांसाठी बी. एड किंवा डी. एड
आणि महाविद्यालयीन शिक्षकांसाठी असलेली नेट -सेट इत्यादी परीक्षा पास असण्याची अट कायम राहील.

ज्याप्रमाणे कांही देशांमध्ये सैनिकी शिक्षण सर्वांसाठी अनिवार्य असते , त्याच धर्तीवर भारतात
शेतीज्ञान हा विषय नव्या पिढीमध्ये शेतीची आवड निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे.
शिवाय शेतीसारख्या निसर्गसंबंधित विषयाच्या प्रात्यक्षिकांसह केलेल्या अभ्यासासामुळे विद्यार्थ्यांचा
शारीरिक , मानसिक व बौद्धिक विकास आपोआपच होतो . याद्वारे विद्यार्थ्याना मिळणारी प्रसन्नता व ऊर्जा
इतर विषयांत प्राविण्य मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते . यापद्धतीत ज्याला जे शिकण्याची खरोखर आवड आहे
ते विनासायास शिकता येते . कारण जेव्हा आवड असते तेव्हा कठीण काहीही नसते . जे लादले जाते
ते सर्व कठीण जाते. याचा फायदा सर्वानाच आहे .

सारांश--
शिक्षणक्रांती नुसार --
हायस्कुल ८ वि ते १०विला १५ विषय असावेत !
पैकी ८ शाळेबाहेर शिकता येतात .
*या पैकी ७ विषय उत्तीर्ण = शालांत परीक्षा उत्तीर्ण (सध्या आहे तसेच ) मात्र
याना फक्त वर्ग- चार नौक-यासाठी पात्र मानावे .
*९ विषय उत्तीर्ण -वर्ग तीन नौक-यास पात्र, ७ वि पर्यंत शिक्षकास हीच अट .
*१० विषय उत्तीर्ण (पहिल्या प्रयत्नात first attempt) - उमेदवार ,वर्ग दोन अधिकारी
व हायस्कुल शिक्षक तसेच महाविद्यालयीन शिक्षक होण्यास पात्र .
*११ विषय उत्तीर्ण - वर्ग -एक साठी मूलभूत पात्रता व ११+विषय आय ए एस
उमेदवारांत कोण सरस ठरवण्यास उपयुक्त कसोटी .
यासाठी विद्यार्थ्यांचा कल व क्षमतेनुसार इयता ८ वि पासूनच खालील प्रमाणे विषय-गट निवडता येतील
१. सरळसात-म्हणजे यादीतील पहिले सात विषय नेहमी प्रमाणेच शाळेतून शिकणे .
२. सोपेसहा - -समजा एखाद्याला गणित व इंग्रजी झेपत नाही तर त्या व्यक्तीला विषय क्रमांक एक ते सहा
+हिंदी किंवा इतर कोणतीही भारतीय भाषा घेता येईल .

३ . सातसोईचे - काही मुले शालेय अभ्यासात ‘’ढ’’ मात्र इतर गोष्टीत पटाईत असतात त्यांची,सध्याच्या
शिक्षण पद्धतीत घोर कुचंबणा होते . अशा विद्यार्थ्याना फक्त सात विषयांतच उत्तीर्ण व्हायचे असेल तर;
ते विद्यार्थी वरील विषय क्रमांक ३ते ७ मधील विषयां ऐवजी यादीतील शाळाबाह्य आठ विषयापैकी क्र. १०)
वरील कॉम्पुटर व इलेक्ट्रिक सामानांची दुरुस्ती हे विषय घेऊ शकतात व या सोबतच एखाद्याला
खेळाची आवड असेल तर त्यास यादीतील क्रमांक अकरा वरील क्रीडा प्राविण्य हा विषय घेता येतो.
यामुळे नौकरी लागली नाही तरीही त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न कॉम्पुटर व इलेक्ट्रिक सामानांची दुरुस्ती
शिकल्या
मुळे सुटतो .आणि जर असे विद्यार्थी शरीराने बलदंड व खेळाच्या बाबतीत प्रतिभावान असतील तर देशाला
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा गाजवणा-या खेळाडूंची सध्या जी कमतरता जाणवते ती दूर होईल.

४. सप्तसृजन - याहूनही अधिक प्रतिभावान व हरहुन्नरी असलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्यांना शालेय विषयांत
रस नसेल ते , भाषा किंवा संस्कृत व शेतीज्ञान या अनिवार्य विषयांसाठीच शाळेत जातील व बाकीचा संपूर्ण
वेळ शाळाबाह्य पाच विषयांना देतील . या प्रकारे त्यांना त्यांच्या आवडीच्या सृजनशील विषयांवर अधिक लक्ष
केंद्रित करता येईल . हा विषयगट निवडणा-या बहुसंख्य विद्यार्थ्याना सरकारी नौकरी शोधण्याची गरज पडणार
नाही ,कारण या योगे सतत तीन वर्षे शिकलेल्या विद्या वा कलेचे ज्ञान वापरून ते स्वयंरोजगार
अथवा लघुउद्योग निर्माण करू शकतात. एवढेच नव्हे तर -

सप्तसृजन- विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्या ,त्या विषयांत पुढील उच्च शिक्षण घेणा-यांना
अगर त्या विषयातील जिल्हा ,राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणा-यांसाठी ,या नव्या शिक्षण
पद्धतीत शाळाबाह्य शिक्षणाची तरतूद असल्यामुळे खाजगी शिक्षकांच्या जागांच्या रूपाने प्रचंड
स्वयंरोजगार निर्माण होईल कारण -

अ . - ‘सप्तसृजन' पैकी त्यांना ज्या विषयांत अधिक प्राविण्य असेल त्या विषयांच्या सरकारमान्य शाळा
काढता येतील आणी-
काढता येतील आणी-
ब . - त्यांच्या लौकिकाच्या प्रमाणात त्या शाळेत शिकण्यासाठी विद्यार्थी येतील व त्यांना फी देखील त्याच
प्रमाणात मिळेल .
प्रमाणात मिळेल .
अशा शाळांना अनुदान देऊ नये त्या ऐवजी विशिष्ठ भौगोलिक क्षेत्रात ज्या शाळांचे जास्तीत जास्त विद्यार्थी
जिल्हा स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत यश मिळवतील अशा तीन शाळांना मिळवलेल्या यशाच्या प्रमाणात
पहिले दुसरे व तिसरे बक्षीस म्हणून उदाहरणार्थ अनुक्रमे दहा लाख ,सात लाख व पाच लाख बक्षीस दरवर्षी
घोषित करावे . त्यामुळे ‘सप्तसृजन' शाळांत दरवर्षी बक्षीस मिळवण्यासाठी निकोप स्पर्धा निर्माण होऊन
कोणतेही सरकारी नियंत्रण अथवा अर्थसहाय्य नसतानाही विद्यार्थ्याना आपोआपच दर्जेदार शिक्षण
मिळेल . अशा स्पर्धामुळे बक्षीस भलेही दोंन तीन शाळातील पाच दहा विद्यार्थ्याना मिळेल परंतु
त्यामुळे अशा हरेक क्षेत्रात ‘’ ना भूतो ना भविष्यती’ अशी गुणवंत व तज्ज्ञांची फौजच तयार होईल
आणि असे गुणवंत देशाला सर्व प्रकारच्या प्रगती बाबत एवढ्या उंचीवर नेवून ठेवतील की तेथे ना शत्रूराष्ट्रे
पोहोचतील ना मित्रराष्ट्रे .

हे साध्य करण्यासाठी नौकरभरती करताना याआधी दिलेल्या खालील मूलभूत शालांत शैक्षणिक पात्रता
अटी ठेवून यापद्धतीला अधिक फलदायी करावे .
‘शिक्षणक्रांती’ नंतर सातवी पर्यंत शिकवणारा शिक्षक देखील दहावीला नऊ विषयांत पास असावा वअटी ठेवून यापद्धतीला अधिक फलदायी करावे .
हायस्कूल शिक्षक तसेच महाविद्यालयीन शिक्षकांसाठी यापैकी दहा विषयांत पारंगत असण्याची अट वर
सुचवलेलीच आहे. याचे कारण अर्थातच शिक्षकाला अनेक विषयांचे ज्ञान असेल तर त्याच्या
अध्यापनाचा दर्जा वाढतो तसेच याद्वारे त्याचा शिक्षकी पेशाकडे असलेला कलही स्पष्ट होतो, हेच आहे .
वर्ग तीन नौक-यासाठी पुन्हा नऊ विषयांची अट ठेवण्याचे कारण कर्मचारी हुशार व कष्ट करायची सवय
यावरून , एखाद्या व्यक्तीला पुढे कोणत्या क्षेत्रात काम करावयाचे आहे व कोणते उच्च शिक्षण
असलेले असावेत हे आहे. पुढील वर्ग एक व दोन अधिका-यां मध्ये नियोजन क्षमता व निर्णयक्षमता हे
गुण मुळातच असणे आवश्यक आहे . या साठी उमेदवाराचा एकंदरीत बौद्धिक स्तर व कल या पंधरा पैकी
जास्तीत जास्त किती व कोणत्या विषयात ती व्यक्ती प्राविण्य मिळवते त्यावरून ठरवता येतो .
आय ए एस किंवा तत्सम परीक्षांत हेच पाहिले जाते .अशा उच्च पदासाठी अकरा व त्यापेक्षा पेक्षा
जास्त विषयांत पास असलेल्या उमेदवारांना प्राधान्य द्यावे.यामुळे मुलाखत घेताना फारसे प्रश्न न विचारता
ही उमेदवाराचा मूळदर्जा त्याची दहावीची गुणपत्रिका पाहूनच लक्षात येतो .
दोन उमेदवारांना समान गुण असतील तर त्यांच्यापैकी जो दहावीला वरील पंधरा पैकी जास्तीत जास्त
विषयांत उत्तीर्ण असेल त्याला सेवाप्रवेशासाठी प्राधान्य द्यावे. तसेच--
राज्य सभा व विधान परिषदेला ख-या अर्थाने वरिष्ठ सभागृहाच्या दर्जावर न्यायचे असेल तर येथील
सदस्यत्वासाठी दहावीला अकरा विषय उत्तीर्ण असण्याची अट लागू करावी.
यावरून , एखाद्या व्यक्तीला पुढे कोणत्या क्षेत्रात काम करावयाचे आहे व कोणते उच्च शिक्षण
घ्यायचे आहे त्यानुसार विषय निवडावे लागतील हे लक्षात येते. उदाहरणार्थ इंजिनियरिंग ला जायचे
असेल तर गणित व विज्ञान विषय दहावीला असलेच पाहिजेत आणि दहावीला हे विषय त्या विद्यार्थ्याने
आठवी व नववीत उत्तीर्ण केले असतील तरच घेता येतील .म्हणजेच आठवी नंंतर मध्येच दुसरा विषय
घेता येणार नाही .तथापी पुढे कधी ही एकूण विषयपास मध्ये वाढ करायची असल्यास त्या विषयाच्या
आठवी ते दहावी या वर्षाच्या , अशा तिन्ही परीक्षा द्याव्या लागतील . अशा प्रकारे योग्य ते विषय इयता
आठवीतच निवडावे लागतील .
ही शिक्षण पद्धती अमलात आणण्यासाठी शाळेचे आणि शाळाबाह्य विषयाचे अध्यापन तसेच

परीक्षेच्या तारखा व तासिका एकाच वेळी येणार नाहीत असे कालनियोजन व वेळापत्रक तयार करावे लागेल .
भारत हा शेती प्रधान देश आहे म्हणून शेतीज्ञान हा विषय यात अनिवार्य केलेला आहे .

या विषयाद्वारे पर्यावरण विज्ञान शिकवण्याचा हेतू आपोआपच साध्य होऊ शकतो .
शेतीज्ञान या विषयात ७० गुणांचे प्रात्यक्षिक व ३० गुणांचे पुस्तकी ज्ञान असावे .
पैकी प्रात्यक्षिक , विद्यार्थ्याना प्रत्यक्ष शेतावर नेऊन तेथेच घ्यावे .
या कामी मदती साठी प्रत्येक शाळेने गावाजवळ शेती असलेल्या शेतक -यास थोडेफार मानधन द्यावे .
शहरात व जेथे शेती नसेल तेथे शाळेतच , मैदानाच्या एखाद्या भागात प्रायोगिक शेती करावी ,
हे देखील शक्य नसेल तर ग्रीन हाऊस बनवून अगर कुंड्यामध्ये रोपे लावून विद्यार्थ्याना शेतीज्ञान द्यावे.
विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत यावरून प्रत्यक्ष शेतीज्ञान वा अप्रत्यक्ष शेतीज्ञान असा उल्लेख करण्यात यावा
.शेतीज्ञान प्रात्यक्षिकांचे मोबाईल द्वारे व्हिडीओ बनवून ते शाळेच्या वेब साईट वर अथवा
शासकीय शिक्षण विभागाच्या संबंधित साईटवर अपलोड करणे सक्तीचे असावे.
जमल्यास इतर विषयांचे अध्यापन देखील काही वेळा शांतिनिकेतन प्रमाणे शेतावर
,निसर्ग सानिध्यात करावे .या दृष्टीने आठवडयातील तीन दिवस शेतावर व तीन दिवस शाळेत अध्यापन
तासिका ठेवाव्यात . या साठी जून ते सप्टेंबर हा पावसाळी कालावधी अत्यंत उपयुक्त राहील. 
अ . सरळसात गटातील विद्यार्थी नेहमी प्रमाणेच वर्षभर शाळा करतील .या विद्यार्थ्याना पुढील प्रकरणात

सुचवलेल्या ‘’हरितज्ञ ‘’ या सरकारी शेतीवरील नौकर भरतीत प्राधान्य द्यावे . किंबहुना ज्या विद्यार्थ्यानी
शालांत परीक्षेला १००गुणांचे शेतीज्ञान घेतलेले असेल त्यांनाच ‘हरितज्ञ ‘पदा साठी पात्र समजण्यात यावे .
ब )विषय क्रमांक ९ पुढील किमान दोन विषय घेणा-यांसाठी इतर सर्व शालेय विषयातून ५०गुणांची सूट द्यावी

अर्थात सप्टेंबर महिन्या पर्यंत संपलेल्या अर्ध्या अभ्यासक्रमावर आधारित घेतलेल्या ५० गुणांच्या परीक्षेला
त्यांची त्या विषयातील अंतिम किंवा वार्षिक परीक्षा समजण्यात यावे .मात्र गुणपत्रिकेत ही बाब दर्शवावी .
याचा अर्थ सप्टेंबर नंतरचा वर्षभरातील संपूर्ण कालावधी शाळेत उपस्थित न राहता ते, शाळाबाह्य विषयाना
पूर्ण वेळ देऊ शकतील .
क ) तथापि यापैकी ज्या विद्यार्थ्याना स्वयंअध्ययन करून शालेय विषयां ची १०० गुणांची परीक्षा द्यायची असेल
त्यांना तशी मुभा असावी व अर्थातच गुणपत्रिकेत त्याप्रमाणे गुणांची केलेली नोंद भावी शिक्षण व नौकरी साठी
गुणवत्ता मूल्यांकनात जमेस धरण्यात यावी . .उदाहरणार्थ एक विद्यार्थी ७५० पैकी ६०% गुण मिळवतो तर
दुसरा जो अधिक विषयात , अधिक गुणांची शालांत परीक्षा देऊन ६०%मिळवतो, समजा ९०० पैकी ६० %
मिळवतो तर त्याची गुणवता निश्चितच अधिक असणार म्हणून त्याप्रमाणे क्रेडिट देता येईल .व या योगे
गुणवत्ता कमावण्यासाठी विद्यार्थी आपोआपच अधिक मेहनत करू लागतील व खरे गुणवत्ताधारक पुढे येतील .

ड . ऑक्टोबर ते जानेवारी हा कालावधी शाळाबाह्य विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी देण्यात
यावा तर फेब्रुवारी व मार्च महिन्यात निरनिराळ्या स्पर्धा व परीक्षांचे आयोजन करावे .

ई . १५ एप्रिलच्या आत विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या शाळा-बाह्य विषयाचे निकाल अर्थात गुण व प्रमाणपत्रे
त्यांच्या मूळ शाळाकडे पोहोचवल्यास ,शालेय व शाळा बाह्य विषयाच्या गुणांची सांगड घालून
विद्यार्थ्यांचे त्या,त्या विषयांचे निकाल एप्रिल अखेर पर्यंत शाळेद्वारे घोषित करता येतील

शुभ्रसि व्यवस्था असताना जर ही शिक्षण पद्धती स्वीकारली तर देशाला अगणित फायदे होऊ शकतात.
कारण यामध्ये व्यक्तीच्या नैसर्गिक गुणवत्तेला शंभर टक्के न्याय मिळतो . उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जिल्हा
पातळीवरील किंवा तालुका पातळीवरील खेळाडू असेल तर अशा व्यक्तीला आवश्यक त्या व्यावसायिक कोर्स
मधील पदवी उत्तीर्ण केल्या नंतर स्वतःच्या विना अनुदान शाळा काढता येतील व अशा शाळांना भरपूर
विद्यार्थी मिळतील. त्याच वेळी ज्यांच्याकडे खेळाची गुणवता आहे त्यांना योग्य वया पासूनच खेळावर
लक्ष केंद्रित करता येईल व या योगे एकतर देशाला चांगले खेळाडू मिळतील किंवा
खाजगी शाळासाठी चांगले प्रशिक्षक मिळतील . कोणत्याही स्थितीत रोजगाराची सोय तर
आपोआपच होईल . ज्या क्रीडा शाळेमध्ये ज्यास्त गुणवंत व नावाजलेले, स्वतः जिल्हा ,राज्य किंवा
राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धां मधून बक्षिसे ,पदके मिळवलेले खेळाडूच प्रशिक्षक असतील
त्या शाळांची फी जास्त असली तरीही तेथे भरपूर विद्यार्थी प्रवेश घेतील . अशा प्रकारे प्रशिक्षक खेळाडूंच्या
गुणवत्ता व मेहनतीची कदर खेळातून निवृत्त झाल्यानंतरही हमखास होतच राहील.
या शिवाय एखाद्या जिल्ह्यातील ज्या शाळेचे विद्यार्थी ज्या वर्षी राज्यस्तरावर वा पुढील स्तरावर
पदके मिळवतात,त्या शाळेला,त्यावर्षी शासनाने विशेष अनुदान द्यावे . त्यामुळे अशा शाळांमध्ये दर्जेदार स्पर्धा
निर्माण होऊन शाळांची गुणवता वाढतच जाईल.

सरकारी शिक्षण विभागाने खेळाप्रमाणेच संगीत,नृत्य , अभिनय, चित्रकला ,हस्तकला
या विषयांच्याही तालुका ते राज्य पातळी पर्यंत स्पर्धा आयोजित कराव्यात यामुळे देखील
त्या,त्या क्षेत्रातील गुणवत्तेत व गुणवंताच्या संख्येत खेळाप्रमाणेच भरघोस वाढ होऊन
त्यायोगे शालेय वयात शिकलेली कोणतीही विद्या अथवा कला वाया जात नाही असा विश्वास
समाजात निर्माण होईल ,भावीपिढी , ख-या अर्थाने सुशिक्षित व सुसंस्कृत होईल, शिवाय
शेतीसानिध्यामुळे पर्यावरणप्रेमी देखील आपोआपच होईल.आज बहुतेक पालक मुलांना
जे मारून- मुटकून डॉक्टर किंवा इंजिनियर वा तत्सम मोजक्या शाखांकडे पाठवण्याचा अट्टाहास करतात
तो प्रकारही बंद यामुळे होईल .

या बरॊबरच ‘’इयता अकरावी व बारावी आर्ट साठी ‘सेंद्रिय शेती’ हा ७० गुणांचे प्रात्यक्षिक
व ३० गुणांचे पुस्तकी ज्ञान असलेला विषय अनिवार्य करावा तर ,विज्ञान अभ्यासक्रमाद्वारे
शेती उत्पादना पासून औद्योगिक उत्पादने मिळवण्याचे तंत्रज्ञान व समकक्ष वाणिज्य शाखे द्वारे
अशा उत्पादनांच्या विनियोगाचे प्रशिक्षण देण्यात यावे’’ असे याच पुस्तकातील
‘’सरकारी शेतीवर कर्मचारी भरती ‘या प्रकरणात सुचवलेले आहे .

शासकीय उच्च पदस्थाना ’याद्वारे अशी कळकळीची व नम्र विनंती आहे की त्यांनी देशकल्याणार्थ ,
ही शिक्षणक्रांती लवकरात लवकर आणावी . यासाठी केवळ अहंकारापोटी अडथळा आणणा-या तथाकथित
विद्वानांना दूर सारावे लागेल. कारण कोणतीही नवीन गोष्ट केवळ दुस-याने सुचवली म्हणून तीची
गुणवता न पहाता ती नाकारणारे काही महाभाग असतात . परंतु ही शिक्षण पद्धती लेखकाची नसून
ती ईश्वरीय देणगी आहे,असे प्रारंभीच सांगितले आहे . लेखक केवळ माध्यम आहे .तथापी यामध्ये
देश, काळ परिस्थिती नुसार कांही सुधारणा व आवश्यक ते बदल जरूर करावेत . शेवटी ज्याने
हे ज्ञान दिले त्या परमेश्वराकडे देशात या शिक्षण पद्धतीचा शुभारंभ लवकरात लवकर होवो ,
हीच प्रार्थना.

आणी असे होताच या -
‘’शिक्षणक्रांती’’ मुळे सुसंस्कृत ,चारित्र्यसंपन्न व चरितार्थ चालवण्यास सक्षम अशी भावी पिढी निर्माण
होऊन राष्ट्राचाही सर्वांगीण विकास होईल व भारतदेश सर्वार्थाने महासत्ता होईल.

Comments