'' WHISTLING HEIGHTS'‘’- RETURN OF Indian music


RETURN OF Indian music
Melody of 60's in the new songs!! it's a wonder but it happened
view the WHISTLING HEIGHTS'' new MUSIC with the '' ओल्ड is गोल्ड हिंदी फिल्म सॉंग्स''

In some songs a new instrument ''Whistle'' is used .
yes it is played as melodiously as flute!!
and the same ""INBUILT'' instrument can produce GENUINE MELODY which can not be played on many instruments due to lack of such practice in today's Music.
WHISTLE CAN PLAY THOSE NOTES WHICH ARE PRESENT IN BETWEEN TWO ADJACENT NOTES WHICH ARE CALLED AS SHRUTI. 
most of the songs of '' WHISTLING HEIGHTS' ,although look very simple are based on Indian classical music and folk songs of India.
WESTERN RHYTHM and instruments like GUITAR and saxophone are employed here to enrich the melody which ultimately bring back the color of 70's HINDI FILM SONGS and
each song is new whether it is a dance number or ROMANTIC song.
As if the songs made and remained unpublished in the GOLDEN ERA of music.
although the language of Music is universal the songs are presented in Marathi and Hindi
on following link
संगीतकार राजा रघुपती रचित नव्या गीतांचा ‘’व्हिसलिंग हाईट्स ‘हा कार्यक्रम लवकरच पुन्हा नव्या रूपात सादर होणार आहे . 
काही वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध गायिका  उत्तरा केळकर यांनी ‘झुळूक मोसंमी वा-याची’ या अल्बम साठी गाणी गायिली होती ती गाणी ऐकून  या अल्बम चे प्रकाशन करताना जेष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी ‘’राजा रघुपती ,तुम्ही एकवेळ तुमचे राज्य सोडा परंतु संगीत सोडू नका ‘’अशी मिस्कील कोटी केली होती .त्याचे अक्षरशः पालन करीत , रिमिक्स आणि अश्लील गाण्याच्या गोंधळात फारसा प्रतिसाद मिळत नसताना देखील स्वतःच्या भावपुर्ण गीतांना भारतीय आणि पाश्च्यात संगीतातील नेमके सौंदर्य हेरून  त्या योगे अनोख्या गीत रचना निर्मितीचे काम राजा रघुपतीनी आजतागायत  चालूच  ठेवले. तीच गाणी आता सुमारे २१ मूळ वादकांसह या’’ व्हिसलिंग हाईट्स ‘म्युझिक शो व you tube द्वारे सादर केली जाणार आहेत .
new YASHAVANT DEV AND RR.jpg या गीतांमध्ये संगीताच्या सुवर्णयुगाचे(१९६०-७०) वैशिष्ठय असलेली मेलोडी किंवा माधुर्य तर आहेच तथापी चालींमध्ये असलेले नाविन्य आजच्या तरुणाईला देखील ख-या संगीताकडे आकृष्ट करणारे आहे .यातील कांही  गीताचे सामूहिक गायन सुमारे दोनशे विद्यार्थी पौर्णिमेच्या रात्री अगर विशिष्ठ प्रसंगी एकत्र येऊन करीत असत ,वैद्यकीय व्यवसायानिमित्य हे रसिक डॉक्टर आता देशविदेशात विखुरलेले आहेत तथापि  कुठे भेट झाली तर ही तशी दुर्मिळ गाणी ते  आजही गुणगुणतात विशेषतः   ‘’वासंतिक उत्तर रात्री ‘’हे गाणे. याचा मुखडाच
                          वासंतिक उत्तररात्री पीठ्ठ चांदण्यात
                           छतावरी लाजरी आणि एकांत .....  
असा शृंगारिक आणि प्रसन्न आहे . या सौम्य- शीतल (आजच्या भाषेत कूल )गाण्याच्या  एकूण तीन अंत-यात  देखील  उदा .
                   लज्जेचे लाल मेघ गालावर दाटले
                  -हदयी च्या स्पंदनांनी उचांक गाठले
                   हाताआड लपवी चेहेरा आणि हसे आत …  
अशी भाव अभिव्यक्तीची आतिषबाजी ‘जसे गीत तशाच प्रकारचे प्रवाही संगीत’’ यामुळे साध्य झालेली आहे.                



कारण गीत व संगीत राजा रघुपती यांचेच आहे. त्यामुळे ही गीतकाव्ये  उत्कट व एकजिनसी वाटतात कुठेही तोचतोचपणा नाही की जोड तोड  नाही जे काही आहे ती आहे भावमनाची तरल  सांगीतिक  प्रतिमा.तरीही या रचनांमध्ये कुठेही बोझड पांडित्य नसून एकच वेळी क्लास आणि ‘मास’ या दोन्ही वर्गाना ही  गाणी आवडतात ,कारण  स्वरबांधणी मध्ये शंकर जयकिशन पासून आर डी बर्मन पर्यंतच्या संगीतशैलीचे अतिशय रंजक मिश्रण अगदी बेमालूमपणे विशेषतः ऑर्केस्ट्रेशन मध्ये ;असे काही  जमलेले  आहे कि वाद्यमेळ वापरण्याची व संगीतरचनांची त्याकाळातील शैली पुन्हा नवे रूप घेऊन  प्रकट झाल्याचा प्रत्यय या ‘’व्हिसलिंग हाईट्स ‘’म्युझिक शो  मधील हरेक गाण्यातून येतो.या कार्यक्रमात ’’कारे धरिला असा अबोला ‘’हे गीत सुप्रसिद्ध सिनेगायिका साधना सरगम  गाणार आहेत  या संगीतरचनेची गहिराई अनुभवताना ,ते महान संगीतकार स्वर्गीय सचिनदेव बर्मन यांचे आशीर्वाद आहेत असे वाटते . ही  रचना एका दुर्मिळ रागात  साकार झालेली आहे ,तथापि यातील गिटारीचे झणत्कार ,सॅक्सोफोन ची आर्त  साद आणि ‘ना  तुम हमे  जानो ‘या हेमंतकुमार व सुमन कल्याणपूर यांनी गायिलेल्या गीता सारखा ताल या संगीतरचनेला  अनोख्या उंचाईवर नेवून ठेवतो,आणि गीतरचनाही त्याच तोडीची आहे उदा .
                                     कारे धरिला असा अबोला
                                     -हदयी असुनी का दुरावा   //धृ //
                      अंतरा -२
                                      पेटले रान सारे हरवले स्वजन कुठे
                                        एकल्या विरही जीवा मृगजळे छळती इथे
                                       सजन घननीळा बरसवा गा--कारे धरिला //२//
                 
              अर्थातच अशाप्रकारचा गीत व संगीताचा एकंदरीत  दर्जा व मनोरंजन  क्षमता(भक्तिगीतांपासून लावणी पर्यंत आणि हळुवार भावगीत ते फिल्मीढंगांचे रॉक अँड रोल गाणी अशी विविधता असलेल्या )  या कार्यक्रमाचे ‘’व्हिसलिंग हाईट्स’’ हे नामकरण यथार्थ वाटते.    
                          

      

Comments